गावाची माहिती

कुंदेवाडी हे गाव सिन्नर शहराच्या अगदी नजीक असून गाव  देवनदीवर वसलेले आहे.कुंदेवाडी हे गाव सिन्नर शहराचे उपअंग आहे.कारण त्याला मध्यतरी कुठलीही सीमा रेषा नाही.त्याची सीमा रेषा हि मुसळगाव येथील गणेश मंदिरापाशी आहे.कुंदेवाडी गावाचे नाव हे कसे पडले आहे हे ह्यात असलेल्या कोणत्याही वयस्कर व्यक्तीला माहित नाही.

  कुंदेवाडी गावात पश्चिमेला त्रिवेणी संगम असून तेथे देवनदी, शिवनदी,सरस्वती नदी या तीन नद्यांचा संगम झाल्यामुळे त्या क्षेत्राला त्रिवेणी संगम असे नाव पडले .तेथे पुरातन काळातील जागृत शिवलिंग आहे. पुरातन कथेमध्ये श्री कृष्ण व बलराम हे युद्धा करिता या ठिकाणी आलेले आहे असा उल्लेख  कथेमध्ये आहे.सिन्नर नगराचे नाव हे पूर्वी शिवनिथ असे होते.येथे बाणासुर नावाचा राजा हा होता.तो मोठा शिव भक्त होता.त्याने भूमार्गाने बारा ज्योती लिंगाची स्थापना केल्याची माहितीचा उल्लेख हा पुरातन कथेमध्ये आहे.

सौ. शितल विजय दोडके 

प्रशासक तथा – सरपंच

मोबाईल क्र. – 888094645

श्री. सुनील नानासाहेब माळी

उप प्रशासक – उपसरपंच

मोबाईल क्र.- 9623808737

श्री. अनिल दामोदर कानवडे

ग्रामपंचायत अधिकारी

मोबाईल क्र.- 9823061535

शासकीय उपक्रम

समारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

शासकीय संकेतस्थळे