कुंदेवाडी गावाचा इतिहास

कुंदेवाडी हे गाव सिन्नर शहराच्या अगदी नजीक असून गाव  देवनदीवर वसलेले आहे.कुंदेवाडी हे गाव सिन्नर शहराचे उपअंग आहे.कारण त्याला मध्यतरी कुठलीही सीमा रेषा नाही.त्याची सीमा रेषा हि मुसळगाव येथील गणेश मंदिरापाशी आहे.कुंदेवाडी गावाचे नाव हे कसे पडले आहे हे ह्यात असलेल्या कोणत्याही वयस्कर व्यक्तीला माहित नाही.

  कुंदेवाडी गावात पश्चिमेला त्रिवेणी संगम असून तेथे देवनदी, शिवनदी,सरस्वती नदी या तीन नद्यांचा संगम झाल्यामुळे त्या क्षेत्राला त्रिवेणी संगम असे नाव पडले .तेथे पुरातन काळातील जागृत शिवलिंग आहे.

पुरातन कथेमध्ये श्री कृष्ण व बलराम हे युद्धा करिता या ठिकाणी आलेले आहे असा उल्लेख  कथेमध्ये आहे.सिन्नर नगराचे नाव हे पूर्वी शिवनिथ असे होते.येथे बाणासुर नावाचा राजा हा होता.तो मोठा शिव भक्त होता.त्याने भूमार्गाने बारा ज्योती लिंगाची स्थापना केल्याची माहितीचा उल्लेख हा पुरातन कथेमध्ये आहे.

कुंदेवाडी गावाची लोकसंख्या ३४४४ असून गावात विविध जाती धर्माची लोक राहतात.गावाचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे.शेतीला जोड धंदा म्हणून गावतील महिला वर्ग हा बिडी बनवण्याचा व्यवसाय करतात.गावा शेजारी औद्योगिक वसाहत असल्यामुळे गावतील बहुतांश लोक हे कंपनी कामगार आहे.गावाला वरदान म्हणून देवनदी  लाभलेली आहे.या देवनदीवर ६ बंधारे असून त्यातील २ बंधारे ब्रिटिश कालीन आहे. कुंदेवाडी गावात पुरातन काळापासून देवी मंदिर,मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, बालाजी मंदिर असे देवांचे भव्य मंदिर आहे.तसेच श्री क्षेत्र संगमेश्वर हे सिन्नर तालुक्यात प्रख्यात असल्यामुळे तेथे महाशिवरात्रीच्या वेळी भव्य असा कार्यक्रम होत असतो.त्या वेळी पंच क्रोशीतील सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

कुंदेवाडी गावाचे ग्रामदैवत हे श्री जगदंबा माता असून गावातील ग्रामस्थ तेथे रामनवमी व नवरात्र उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध प्रकारचे कार्यक्रम घेतात.

कुंदेवाडी गावाचे दोन भाग आहे कुंदेवाडी मजरे व कुंदेवाडी मौजे

कुंदेवाडी गावाची स्थापना   १ मार्च १९६६         

सन २०११ चे जनगणने नुसार गावाची लोकसंख्या हि ३४४४ इतकी आहे.

एकुण कुटुंब संख्या ५७२  

तपशील पुढील प्रमाणे

पुरुषस्रीएकून
१८१३१६३१३४४४

जाती जमाती लोकसंख्या

तपशीलपुरुषस्रीएकुण
अनु सुचित जाती७४८७१६१
अनु सुचित जमाती२७३२३४५०७
इतर१४६६१३१०२७७६
गावाची भौगोलिक स्थिती
मौजे /मजरे एकुण  क्षेत्र४६० हे
बागायत  ३१० हे   जिरायत १५० हे   गायरान ६ हे
ग्रामपंचायत कार्यालय
एकुण खातेदार संख्या१०१४
एकुण घरांची संख्या९३४  (पडीत जागे सहित )
पाणी कर१०० रुपये प्रति महिना
गृह कर०.७० पैसे ते २.५० पैसे पर्यंत
सार्वजनिक नळ संख्या
हातपंप
इंदिरा आवास घरकुल /इतर घरकुल योजना संख्या२८
एकुण सिंचन विहिरी संख्या३२०
एकुण शौचालय संख्या 
गोवर गँस संख्या
प्राथमिक शाळा१ ते ४ थी
अंगणवाडी केंद्रे
आरोग्य वर्धनी केंद्र
व्यायाम शाळा
सार्वजनिक सभागृह
एकुण सार्वजनिक  विहीर
बोरवेल
बचत गट संख्या४८
एकुण विदूत पोल संख्या१३८
एकुण गोठ्यांची संख्या४५
पोस्ट ऑफिसमुसळगांव